ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शर्वरी मुठे यांच्या महान कार्याला सलाम… शिक्षण हे सर्वव्यापी आणि सर्वांच्या कक्षेत असावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : महिला हे शक्तीचे मूर्त रूप आहे. सचोटी, प्रामाणिकता, जिद्द, नीटनेटकेपणा या गुणांचा वास आहे. शिक्षण ही काळाची गरज असण्यासोबतच प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. शिक्षण हे सर्वव्यापी आणि सर्वांच्या कक्षेत असावे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. या सर्व गुणांचा संगम म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील शर्वरी मुठे! याच विचारला केंद्रबिंदू मानून शर्वरी मुठे या विद्यार्थिनींना ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपल्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या माध्यमातून करत आहे. भावी पिढीचे विशेषत: शिक्षणापासून वंचित रहावे लागणाऱ्या मुलींना ज्ञानदानातून त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले आहे.
शर्वरी मुठे यांनी कोथरूडमध्ये वंचित मुलांच्या शिक्षणासाठी जिव्हाळा फाउंडेशनची स्थापना केली. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला हक्क मिळवून देण्याचं पवित्र कार्य शर्वरी मुठे करत आहेत. आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून दूर राहणाऱ्या मुलींना मोफत वसतिगृहाची सुविधा देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं महान कार्य शर्वरी करत आहेत. त्यांच्या या महत्वपूर्ण उपक्रमाला चंद्रकांत पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे. आज २०० हुन अधिक विद्यार्थिनी त्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेत आहेत. या मुलींना पाटील यांनी स्वतः भेटून संवाद साधला. त्याचबरोबर संस्थेतील प्रत्येक स्टाफ सोबत देखील संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. येथील मुलींना शाळेत सोडण्यासाठी पाटील यांनी बसची सुविधा उपलब्ध करून दिली. या बसमुळे मुलींना शाळेत ने आण करणे सोपे झाले, तसेच कुठे विशीत न्यायाचे असेल तेही सोपे झाले. चंद्रकांत पाटील आपल्या कर्तव्याशी किती एकनिष्ठ आहेत हे यावरून समजते.