नवरात्रोत्सवानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातील भवानी पेठ, सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर,गौड ब्राह्मण समाजाचे चारभूजा माता मंदिरात देवीचे घेतले दर्शन
पुणे : हिंदू धर्मामध्ये स्त्री हे आदिशक्तीचे रूप असून तिला देवी स्वरूप मानाचे स्थान आहे. नवरात्र म्हणजे देवीची उपासना करण्याचा आणि मातृ शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव. या नवरात्रोत्सवानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातील भवानी पेठ, सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर, कोथरुड मधील सिरवी क्षत्रिय समाजाचे आई माता मंदिर, गौड ब्राह्मण समाजाचे चारभूजा माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. देवी चरणी लीन होऊन पाटील यांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी म्हणजे साक्षात महिषासुरमर्दिनीचे रुप! महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक या मंदिरात येऊन नतमस्तक होतात, मागणं मागतात. त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्त पाटील यांनी आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यासोबतच पाटील यांनी आज पुणेकरांचे श्रद्धास्थान आई चतुःश्रृंगी मातेचे दर्शन घेतले. आईच्या दर्शनाने मनाला विलक्षण समाधान आणि ऊर्जा लाभली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. यावेळी आईच्या दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या लाडकी बहिण योजना आणि मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.