भाजपाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन घेतले आशीर्वाद
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. भाजपाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे कोथरुड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवतीर्थास भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. देव आहे हि श्रद्धा आहे म्हणून आणि चांगलं काम केल्यावर देव आपल्याला आशीर्वाद देतो म्हणून कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला तसेच आभार मानायला आलो असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी पक्षावर नाराज असलेले अमोल बालवाडकर यांची भेट घेऊन त्यांना समजावणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले.