पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल चंद्रकांतदादांचे आभार- मंगेश खराटे
पुणे : पानशेत पूरग्रस्तांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत; सोडविल्या बद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानून आपला पाठिंबा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर केला.
पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष मा. माधवजी भांडारी, राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे सदस्य माधवजी कुलकर्णी पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे उपाध्यक्ष मंदार बलकवडे, सदस्य गजानन माझिरे,राजाभाऊ महाडिक, केदार बलकवडे, सतीश दिघे, मंगेश मते, रुपेश अटक, मोहन शिगवण, किरण देखणे, अजित पंधे, धर्मेंद्र खांडरे, संदीप मराठे, शशिकांत देवजीरकर, राजा मारणे, ऋषिकेश माने, बालगुडे, मयूर मते,अथर्व बलकवडे, सोहम होले, कल्पेश गरुड तसेच इतर असंख्य पूरग्रस्त उपस्थित होते.
मंगेश खराटे म्हणाले की, पुणे शहरातील १३ पूरग्रस्त वसाहती मधील रहिवाशांच्या मालकी हक्काबाबत अनेक अडचणी होत्या. ६२ वर्षांचा संघर्ष करुनही दूर होत नव्हत्या. त्यामुळे त्यांना मालकी हक्काचा लाभ मिळत नव्हता. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्य सरकारने चंद्रकांतदादा पाटील आणि माधवजी भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन निर्णय घेतला होता. दुर्दैवाने २०१९ मध्ये सत्तापरिवर्तन होऊन मविआ सरकार अस्तित्वात आले. त्यांनी सदर निर्णयाची अंमलबजावणी केली नाही.
ते पुढे म्हणाले की, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटले. त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत तातडीने बैठक घेऊन मागील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज याची अंमलबजावणी होत आहे, याचे समाधान आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पानशेत पूरग्रस्तांच्या अडचणी दूर झाल्या आहेत, अशी भावना खराटे यांनी यावेळी व्यक्त केली.