मुळशी तालुक्यातील जवळगाव येथे दोन कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारलेल्या विविध विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : मुळशी तालुक्यातील जवळगाव येथे दोन कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारलेल्या विविध विकासकामांचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या गावाची गरज ओळखून विकासकामांसाठी निधीची मागणी करावी. तसेच, मंजूर निधीसाठी प्राधान्यक्रम ठरवून ती कामे पूर्ण करावीत. गावा-गावामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले पाहिजेत, अशी भावना या वेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, सरपंच उज्वला घारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.