पूर्वांचल विकास प्रतिष्ठान संचलित ‘ईश्वरपूरम् ‘ या संस्थेच्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

19

पुणे : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांचे पुण्यातील घर असलेल्या पूर्वांचल विकास प्रतिष्ठान संचलित ‘ईश्वरपूरम्.’ या संस्थेच्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या संस्थेत ईशान्य भारतातील जवळपास ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वार्षिक महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेली लोकनृत्ये पाहून भारावून गेलो असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले कि, या भागातील देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी पद्मनाभ आचार्यजींनी पुढाकार घेऊन आंतरराज्य विद्यार्थी शिक्षण सेवेचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड सारख्या दुर्गम भागातील नव्या पिढीत शिक्षणासह भारतीय संस्कृती आणि परंपरा रुजविण्यासाठी मदत झाली. ‘अलग भाषा, अलग वेश; फिर भी अपना एक देश’ हा संस्कार घेऊन हे विद्यार्थी इथून जातात, असे या वेळी त्यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, पुणे सारख्या महानगरात लोकोपयोगी उपक्रम वाढले पाहिजेत‌. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली पाहिजे. जेणेकरून ईशान्य भारतातील मुलांमधे भारतीय संस्कृती आणि विचार रुजू शकेल, अशी भावना या वेळी व्यक्त केली.

या वेळी संस्थेच्या प्रस्तावित कै.पद्मनाभ आचार्य कौशल्य विकास, कै.अर्जून मस्तुद स्मृती पॉलिहाऊसचे भूमिपूजन केले. या प्रसंगी माजी आमदार दीपक पायगुडे, प्रदीपदादा कंद, संस्थेचे विनीत कुबेर, बाळासाहेब चंद्रात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.