पुण्यनगरीतील ऐतिहासिक वास्तू शनिवारवाड्यास आज 293 वर्ष पूर्ण… अशा ऐतिहासिक वास्तूंमधून पुढील अनेक पिढ्यांनी प्ररेणा घ्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

17

पुणे : शनिवार वाडा हा पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. पहिले बाजीराव पेशवे यांनी सन 1736 साली शनिवार वाडा बांधला. त्यानंतरच्या काळात शनिवार वाडा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख केंद्र बनले. या ऐतिहासिक वास्तूस २९३ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. यानिमित्ताने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास कार्यक्रमास उपस्थित राहून पेशव्यांच्या स्मृतीना अभिवादन केले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशा ऐतिहासिक वास्तूंमधून पुढील अनेक पिढ्यांनी प्ररेणा घ्यावी, अशी भावना या वेळी पाटील यांनी व्यक्त केली.

पुण्यनगरीतील ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा हा मराठा साम्राज्याच्या शौर्य, पराक्रम आणि वैभवाचा जिवंत साक्षीदार आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय नेतृत्वाची आणि पराक्रमाची आठवण म्हणून ओळखला जाणारा शनिवारवाड्याने आज 293 वर्ष पूर्ण केली.

या प्रसंगी, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.