भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

28

कोल्हापूर : कोल्हापूर येथे आज भारतीय जनता पक्षाचा संविधान गौरव अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमित गोरखे, आमदार राहुल आवाडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे महतव अधोरेखित करताना चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर राज्यातील ६ हजारपेक्षा अधिक महाविद्यालयात “संविधान गौरव महोत्सव” घेण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व वि‌द्यापीठांमध्ये तज्ज्ञांच्या व्याखानांचे आयोजन, निबंध स्पर्धा व वत्कृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पोस्टर/भित्तीपत्रके स्पर्धा, चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदा, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये राज्यघटने विषयी व्याख्यानांचे आयोजन असे या उपक्रमाचे स्वरुप असणार आहे. या माध्यमांतून भारतीय राज्यघटनेची ओळख आणि नागरी कर्तव्ये व अधिकारांबाबत जनजागृती व्हावी, हा एकमेव उद्देश असल्याचे पाटील यांनी म्हटले.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, ब्रिटिश सरकारचा कायदा व भारतीय संविधानाची निर्मिती, घटना समिती याबाबत अनेक पैलू उलघडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाबाबतचे योगदान याविषयी उपस्थितांना चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी इंग्लंड मधील स्मारक, संविधान दिन ते इंदूमिल मधील स्मारक इत्यादी गोष्टींचा उल्लेख करत बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित मोदी सरकार व फडणवीस सरकार करत असलेल्या कार्याचा गौरव केला व पुढील काळात देखील बाबासाहेबांचे विचार व कार्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील असल्याचे म्हटले.

अभियानाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान ग्रंथ व भारतमातेचे पूजन करून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी नाथाजी पाटील, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, रूपाराणी निकम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.