कराडमध्ये “यशवंत नगरी” माध्यम समुहाचा २०व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा संपन्न

कराड : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या “यशवंत नगरी” माध्यम समुहाचा २०वा वर्धापन दिन व यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि.८ फेब्रुवारी रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन येथे दिमाखात पार पडला.
माजी खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,आ.मनोजदादा घोरपडे, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.सुरेशबाबा भोसले,भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ,कराड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, डिजिटल मिडिया संघटनेचे संघटक तेजस राऊत, जिल्हा अध्यक्ष संतोष शिराळे आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपादक विकास भोसले,सौ.स्वाती भोसले आणि “टीम यशवंत नगरी” ने या सोहळ्याचे नियोजनपूर्वक परिश्रम घेतले. विकास भोसले आणि परिवाराचे राजा माने यांनी मनापासून अभिनंदन केले.