विद्याताई पोळ यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार सन्मान

5

कोल्हापूर : सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या विद्याताई गुलाबराव पोळ यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या रविवार दिनांक २९ जानेवारीच्या महाअधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठावर हा महासोहळा होत आहे. विद्याताई पोळ यांची महाराष्ट्र महागौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे शुभहस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजीटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ वितरण केले जाणार आहे.

महाराष्ट्रातुन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या कोल्हापुर-पेठवडगाव येथील विद्याताई गुलाबराव पोळ यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिले आहे. या सोहळ्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. विद्याताई पोळ यांनी शाहु शिक्षण प्रसार मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रसार कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण चळवळीत सक्रीय सहभाग त्यांचा आहे.

राजकीय क्षेत्रातील सहभाग
वडगांव नगरपरिषद वडगांव माजी नगराध्यक्षा
वडगांव नगरपरिषद वडगांव विद्यमान नगरसेविका
अध्यक्षा : यादव पॅनेल आघाडी, पेठवडगांव

सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदान
अध्यक्षा : श्री विजयसिंह यादव प्रतिष्ठान पेठवडगांव
अध्यक्षा : कल्याणी सखीमंच, पेठवडगांव
संचालिका : देवगिरी पाणी पुरवठा सहकारी संस्था, पेठवडगांव

शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग
सचिव : श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ पेठ वडगांव

वैयक्तिक :
डायरेक्टर : देवगिरी अ‍ॅग्रो प्रोडक्ट, प्रा. लि. पेठवडगांव
प्रोप्रायटर : देवगिरी पेट्रोलियम सर्व्हीसेस, हालोंडी, ता. हातकणंगले
डायरेक्टर : देवगिरी फ्रुड प्रोडक्टस असोशियन, पेठ वडगांव

Get real time updates directly on you device, subscribe now.