उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गरवारे महाविद्यालयातील मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

84

पुणे : उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. एकूण ८४२ अभ्यासक्रमांसाठी सरकारने अर्थसंकल्पात २ हजार कोटींची तरतूद केली आणि शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी दिशानिर्देश देखील जारी केले. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गरवारे महाविद्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी पाटील यांनी थेट विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

चंद्रकांत पाटील यांनी आज गरवारे विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलींनी ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, तसेच विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशा सूचना यावेळी पाटील यांनी केल्या.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव हे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.