कोथरुडच्या वस्तीभागात आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी आरोग्य शिबिरे राबवली पाहिजेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

19

पुणे : राष्ट्रीय शिक्षण मंडळ, पुणे संचालित वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल रुग्णालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णालयाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारी ‘स्वास्थ्य पर्व’ स्मरणिका आणि‌ नानल रुग्णालयाच्या डायमंड कार्डचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचे महत्व मोठे आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देखील आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासाठी काम करत आहेत. संपूर्ण जगाचा भारतीय आयुर्वेदावर प्रचंड विश्वास आहे. कोथरुडच्या वस्तीभागात आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी आरोग्य शिबिरे राबवली पाहिजेत, अशी भावना याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.पुराणिक, उपाध्यक्ष डॉ.भागवत, सचिव राजेंद्र हुपरीकर, वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.डोईफोडे, उपमुख्याधिकारी डॉ.प्रमोद दिवाण, डॉ.संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.