पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध “भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचा” समारोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे संपन्न

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध “भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचा” समारोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे संपन्न झाला. यावेळी मंत्रिमंडळातील मंत्री बाबासाहेब पाटील, प्रकाशजी आबिटकर, खा. धनंजयजी महाडिक, आ. अशोकराव माने, कृष्णराज महाडिक, भाजपा नेते नाथाजी पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, यंदाच्या प्रदर्शनात हरियाणातील ‘विधायक’ नावाचा रेडा, साडे सात फूट उंचीच्या ‘काँकरेज’ बैलांसह ५०० पेक्षा विविध जातींची जनावरे प्रमुख आकर्षण होते. पाटील यांनी या महोत्सवास भेट देऊन कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा “आदर्श शेतकरी” पुरस्कार देऊन गौरव केला. आणि पुढील वर्षी या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचे स्टॉल लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.
शेती व शेतीविषयक विविध अवजारे, खते, बी-बियाणे, औषधे, यंत्रसामग्री, ड्रोन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी सर्व काही एका छताखाली म्हणजेच भीमा कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध होत आहेत. गेली सोळा वर्षे शेतकऱ्यांना शेतीविषयक जागृत करण्याचं काम भीमा कृषी प्रदर्शनातून होत आहे परंतु यापुढे या गोष्टीवर न थांबता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकल्प सुरू करावेत यासाठी चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सौ. अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, सौ. मंजिरी महाडिक, राहुल चिकोडे, बाबासाहेब पाटील आसूर्लेकर, रूपाराणी निकम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.