पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

51

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पन्हाळगड, कोल्हापूर येथे “पन्हाळगडचा रणसंग्राम” या लघुपटाच्या प्रदर्शनासह “13 D” थिएटरचे उदघाटन केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाला भेट दिली.

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पन्हाळगडावर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या १३ डी शोचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या ठिकाणी आहोत. शिवराय आपले आराध्य दैवत आहेत. या सर्व इतिहासामध्ये पन्हाळगडचे महत्त्व वेगळे आहे. पन्हाळगडचा इतिहास या १३ डी च्या माध्यमातून जगता येणार आहे. यातील महत्त्वाच्या प्रसंगातून युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो, असे फडणवीस म्हणाले.

पन्हाळगडचा रणसंग्राम लघुपट व १३ डी थिएटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगड येथे कोनशिला अनावरण व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी थिएटरच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली शिवकालीन शस्त्रे, मुद्रा, नाणी, शिवरायांची वेशभूषा आदींची पाहणी करून माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पन्हाळगडाच्या इतिहासाबाबत माहिती देणारी चित्रफीत पाहून पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट पाहिला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांना चांदीची तलवारही भेट देण्यात आली.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा नगरपालिका मुख्याधिकारी चेतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.