विधानसभेत, विधान परिषदेत नियमानुसार कामकाज होत नाही; पक्षपातीपणा केला जातो, याबाबत महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

47

मुंबई : सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्ष यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज राज भवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन निवेदन दिले. संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भुमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे, असे मत यावेळी राज्यपालांकडे मांडण्यात आले असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा सभागृहामध्ये मा. सभापती व मा. अध्यक्ष यांचेकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियम बाह्य सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावेळी केला. आणि त्याबाबत राज्यपाल यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देखील दिले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ गटनेते व आ. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप,शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत,सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.