उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत घेतला सहभाग… उपस्थित सर्व बांधवांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा

20

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त आपल्या कोथरुड मतदारसंघात आयोजित शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी उपस्थित सर्व बांधवांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी शोभायात्रेत पालखी हाती घेतली. तसेच त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. लहान वारकऱ्यांसोबत टाळ वाजवण्याचा आनंद देखील घेतला. विविध प्रकराची वाद्ये वाजवत पाटील यांनी संपूर्ण शोभायात्रेत आनंदाने सहभाग घेतला.

दरम्यान कोथरुड मतदारसंघातील गजानन महाराज ग्रुप व बाल तरुण मित्र मंडळ आणि अखिल पौड फाटाच्यावतीने पौड फाटा येथे दरवर्षी प्रमाणे हरिनाम कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पाटील यांनी सहभागी होऊन हरिनाम सेवेत तल्लीन झाले.‌ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या भूतदयेच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलं पाहिजे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.