जय भवानी नगरमधील बौद्ध विहाराचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : देशाला संविधान अर्पण करणाऱ्या महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती! यानिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. सर्वप्रथम पुणे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान जय भवानी नगरमधील बौद्ध विहाराचे लोकार्पण देखील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोथरुड मतदारसंघाच्या जय भवानी नगरमधील बौद्ध विहाराच्या नूतनीकरणाची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिकांकडून होत होती. त्यानुसार पाटील यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून सदर विहाराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले असून, आज पाटील यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना महामानव, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी भीम ज्ञान प्रसारक संघाचे संस्थापक अध्यक्ष जितेश दामोदरे, रिपाइं आठवले गटाचे नेते ॲड. मंदार जोशी, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, बाळासाहेब खंकाळ यांच्यासह सर्व भीम अनुयायी उपस्थित होते.