खेळघर परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न

कोल्हापूर : आज हॉटेल अयोध्या या ठिकाणी खेळघर परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी सपत्नीक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लहान मुलांचे औक्षण करून आशीर्वाद देण्यात आले. खेळघर परिवार कोल्हापूर हा पालकमंच कोल्हापुरात २००९ पासून कार्यरत आहे. मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतींची जोड देणे हे उद्देश्य ठेऊन या उपक्रमाची सुरुवात आम्ही केली होती, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
खेळघरच्या विद्यार्थ्यांची संख्या २२०० पर्यंत पोचल्याचा आनंद यावेळी व्यक्त करतानाच या उपक्रमाचे चांगले परिणाम विद्यार्थी आणि पालकांना जाणवत असल्याचे तसेच संस्कार आणि संस्कृती रुजवण्याचे कार्य खेळघर उत्तम प्रकारे करत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांसाठी त्यांना पसंत असेल असा एक शिवलेला ड्रेस भेट स्वरूपात देणार असल्याची घोषणा याप्रसंगी त्यांनी केली. बालचमू आणि शिक्षकांना शालेय साहित्याचे वितरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बी.बी यादव, राहुल चिकोडे,किशोर देशपांडे, खेळघरच्या सुमेधा कुलकर्णी, कविता मोहिते, चित्रा कशाळकर, अपर्णा कुलकर्णी, सारिका रणदिवे, संपदा कांबळे, अश्विनी शिरगावकर आदी उपस्थित होते.