मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये आता मिळणार ATM सुविधा

87

मुंबई: मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, आता पंचवटी एक्सप्रेस मधील प्रवाशांना ATM सेवेचा लाभ घेता येणार आहे.मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये “प्रायोगिक तत्वावर” ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) बसवण्यात आली असल्याची माहिती से मध्य रेल्वेच्या (सीआर) अधिकाऱ्यांनी दिली आहे.एका खाजगी बँकेने पुरवलेले हे एटीएम दैनंदिन एक्सप्रेस सेवेच्या वातानुकूलित चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून आणि लवकरच प्रवाशांना ते उपलब्ध करून दिले जाईल, असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.

सध्या हि सेवा प्रायोगिक तत्वावर असली तरी निशिचीतच पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आलेले हे एटीएम लवकरच इतरही रेल्वे मध्ये दिसेल असा विश्वास प्रवासी व्यक्त करत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.