पायलट ट्रेनिंग अकादमी ही वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी सुसंधी ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघात पायलट ट्रेनिंग अकादमी सुरू करण्यात आली आहे. या अकादमीचे उद्घाटन आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही अकादमी वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी सुसंधी ठरेल, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने देशविदेशातील अनेक विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असतात. विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यामुळे पुण्यात नवनवे आणि आधुनिक अभ्यासक्रम विविध शैक्षणिक संस्थांकडून शिकविले जातात. अशाचप्रकराची एक ट्रेनिंग अकादमी कोथरुड मतदारसंघात सुरू करण्यात आली आहे. या अकादमीमध्ये पायलट ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या अकादमीचे उद्घाटन आज चंद्रकांत पाटील यांनी केले . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ते म्हणाले कि, महाराष्ट्रातील वैमानिकांची संख्या कमी आहे. ही अकादमी वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी सुसंधी ठरेल, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती अर्चना चंदनशिवे, अकादमीचे संचालक प्रदीप राठोड, कॅप्टन अंकिता राठोड उपस्थित होते.