भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचा “बहुजन मित्र पुरस्कार” प्रदान

152

पिंपरी : भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महोत्सव बहुजन प्रतिष्ठान प्रणित आणि बहुजन संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भिमोत्सव २०२५ अंतर्गत सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार चंदन कांबळे यांच्या भिमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या महोत्सवाच्या निमित्ताने बहुजन संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा “बहुजन मित्र पुरस्कार” भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडेजी यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आला.या गौरवाबद्दल अनुप मोरे यांनी आयोजकांचे आभार मानले. अत्यंत प्रभावी आणि सुसंगत अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मनोज तोरडमल यांचे आणि सहकाऱ्यांचे विशेष कौतुक देखील त्यांनी केले.

या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजप युवा मोर्चाच्या सचिव तेजस्विनी कदम, पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, मा. नगरसेविका मोना कुलकर्णी, मा. नगरसेवक सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, अभिषेक बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.