मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमाईंच्या मूळ गावी तसेच भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावांस सपत्नीक दिली भेट

30

दापोली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. रत्नागिरी दापोलीतले वणंद म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पंचस्थळांपैकी प्रमुख ठिकाण. या ठिकाणी पाटील यांनी सपत्नीक भेट दिली. यासोबतच भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावांस देखील भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, कोटीकोटींची माऊली, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचे जन्मगाव, रत्नागिरी दापोलीतले वणंद म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पंचस्थळांपैकी प्रमुख ठिकाण! माता रमाईंनी आपल्या निष्ठेने आणि त्यागाने बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याला खंबीर आधार दिला होता. त्यामुळे त्या आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. अशा या त्यागमूर्ती माता रमाईंच्या मूळ गावी आज भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक अभिवादन केले.

भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावांस भेट देऊन, अण्णांच्या स्मृतींना देखील पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी, महर्षींचे कार्य आणि विचार त्यांच्या मूळ गावी पुढे नेणाऱ्या वझे कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीत महर्षी कर्वेंच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू, जगातील नामवंत मंडळींसोबत असलेले त्यांचे दुर्मिळ फोटो, त्यांच्या हस्ताक्षरातील कविता, त्यांच्या कार्याची ओळख व चरित्रपर माहिती वझे यांच्या संग्रहालयात बघायला मिळाली. अण्णांचे कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी वझे कुटुंबियांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल ऐकून अतिशय आनंद आणि अभिमान वाटला, असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.