सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा

पुणे : सोमेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल 2025 या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी ‘व्हाईस ऑफ चॉईस’ पुरस्काराचे वितरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यंदा हा पुरस्कार डॉ. विनय थोरात,पत्रकार शिवानी पांढरे, मा.सभागृह नेते मा. निलेश निकम आणि अॅड. शितल कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र तो तेवढ्याच दिमाखात चालू ठेवणे हे खूप कठीण असते. स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी सुरू केलेली ही स्पर्धा तब्बल 23 वर्षांनंतरही आज उत्तम रीतीने सुरू आहे. सनी निम्हण यांनी त्यांचा सामाजिक आणि राजकीय दोन्ही वारसा समर्थपणे घेतलेला आहे.” तसेच पाटील यांनी सोमेश्वर फाउंडेशन तर्फे राबवण्यात येणाऱ्या लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांचेही मनःपूर्वक कौतुक केले.
कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा! सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित २३ वी पुणे आयडॉल स्पर्धा यंदा उत्साहात आणि उदंड प्रतिसादात पार पडली. ७०० हून अधिक स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. चारही गटाच्या प्रथम विजेत्यास १५ हजार रुपये व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, यांसह सर्वांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.