पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या धम्म विनया मॉनेस्ट्री प्रकल्पाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

पुणे : बहुजन सामाजिक संस्था पुणे यांच्या अथक प्रयत्नातून पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या धम्म विनया मॉनेस्ट्री प्रकल्पाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी या प्रकल्पाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले, अतिशय निसर्गरम्य वातावरणात तथागत गौतम बुद्धांच्या शांततेचा मंत्र अनुभवणारा हा परिसर म्हणजे एक अलौकिक स्थान म्हणावे लागेल. हा प्रकल्प उभारणीतील बहुजन सामाजिक संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांचे समर्पण, कष्ट, आणि ध्यास अतिशय उल्लेखनीय आणि अभिनंदनास्पद आहे. या भेटीत सर्व प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच, तथागतांच्या प्रतिमेचे पूजन करुन ध्यान धारणा केली. यावेळी या प्रकल्पाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी मुख्य माहिती अधिकारी रत्नाकर गायकवाड, विलास वैष्णव, सुरेश साखळे, डॉ. राजेश थोरात, माजी नगरसेवक अविनाश साळवे, अँड. अतुल साळवे, सुनील मोहिते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.