स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना आपण समजून घेणं आणि यथाशक्ती त्याचं अनुकरण करणं, हे अत्यंत महत्त्वाचं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

17

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते जगन्नाथ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सावरकर यांच्याबद्दल आपले विचार मांडले.

यावेळीचंद्रकांत पाटील म्हणाले कि, स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक धगधगता विचार होता. सर्वसाधारणत: क्रांतिकारक हा शब्द आपण देशभक्ती आणि भारताचा स्वातंत्र्यलढा या संदर्भात योजतो. पण सावरकरांच्या अनेक विषयातल्या विचार आणि कृती अभ्यासल्या तर या शब्दाची खरी व्याप्ती ध्यानात येते. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांना आपण समजून घेणं आणि यथाशक्ती त्याचं अनुकरण करणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जगन्नाथ कुलकर्णी यांचे कुटुंबीय आणि तेथील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.