“पाटीदार समाज” हा अतिशय कष्टाळू समाज, जिथेही जातात, तिथल्या समाजाशी, संस्कृतीशी एकरुप होऊन जातात – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : श्री पाटीदार समाज, पुणेच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील यांनी समज बांधवाना मार्गदर्शन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “पाटीदार समाज” हा अतिशय कष्टाळू समाज आहे. जिथेही जातात, तिथल्या समाजाशी, संस्कृतीशी एकरुप होऊन जातात. विद्यार्थी परिषदेच्या काळापासून मला पाटीदार समाजाचा सदैव स्नेह मिळाला,” अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी पाटीदार समाजाचे सर्व प्रमुख नेते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.