कोथरुड मिसिंग लिंकबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आढावा बैठक… सदर काम पावसाळ्यापूर्वी जलदगतीने कालबद्ध पूर्ण करावे – मंत्री चंद्रकांत पाटील

14

पुणे : कोथरुड मिसिंग लिंकबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि इतर अधिकाऱ्यांसोबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीदरम्यान प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, जमीन संपादन, वाहतूक नियोजन आणि निधीवाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सदर काम पावसाळ्यापूर्वी जलदगतीने कालबद्ध पूर्ण करावे, अशा सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, भूसंपादन आणि मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे आदी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा चंद्रकांत पाटील यांच्या समोर सादर केला. यामध्ये एरंडवणे रजपूत वाटभट्टीचे रूंदीकरण, एकलव्य महाविद्यालय येथून चांदणी चौक महामार्गाला जोडणारा रस्त्याचे जमीन अधिग्रहण झाले असून, पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.

कसपटे वस्ती, भीमनगर वसाहत, कर्वेनगर मधील शिवणे खराडी रस्ता, बाणेर-बालेवाडी भागातील मिसिंग लिंकबाबत पाटील यांनी सदर काम पावसाळ्यापूर्वी जलदगतीने कालबद्ध पूर्ण करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.