“विकसित महाराष्ट्र २०४७ : जाणीव जागृती” कार्यशाळेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, उच्च शिक्षण संवर्ग महाराष्ट्र प्रदेश आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित महाराष्ट्र २०४७ : जाणीव जागृती” कार्यशाळेचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
राज्यातील एम.फिल अर्हताधारक १,४२१ प्राध्यापकांचा तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ आणि इतर संघटनांनी सन्मान केला.
यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा प्रांताध्यक्ष डॉ. प्रदीप खेडकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशनचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशनच्या कार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.