मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळांना छत्रपती शिवरायांचे पुतळे भेट

कोल्हापूर : सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरु झाली आहे. प्रत्येक मंडळ आपले नवनवे देखावे साकारत आहेत. संकल्पना राबवत आहेत. यातच कोल्हापुरातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांचे पुतळे भेट दिले जात आहेत. गणेश उत्सव साजरा करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील गणेश मंडळांना हे पुतळे रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राधानगरी तालुक्यातील गणेश मंडळांना छत्रपती शिवरायांचे पुतळे भेट देण्यात आले. शिवाजी महाराजांचे हे पुतळे सामाजिक कार्याची प्रेरणा निरंतर देत राहतील, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, व्ही टी जाधव, लहुजी जरग, डॉ .सुभाष जाधव ,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवीश पाटील कौलवकर, विजय महाडिक, धीरज करलकर, विलास रणदिवे ‘ राधानगरी मंडल अध्यक्ष स्वप्निल जरग, संतोष कातिवले , शिवाजी सरावने, मानसिंग पाटील ,अरुण पाटील, आदी उपस्थित होते.