मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे घेतले दर्शन

पिंपरी चिंचवड : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मंगळवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येथील शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.
चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले. गणरायाच्या कृपेने काटे कुटुंबियांवर तसेच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्याची कृपा सदैव राहो, अशी मनोकामना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यासोबतच पाटील यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार उमाताई खापरे यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. या मंगलमूर्तीच्या कृपेने लांडगे आणि खापरे कुटुंबियांसह संपूर्ण पुणेकर जनतेवर आरोग्य, सुख, शांती, यश आणि समृद्धीचा वर्षाव होवो, हीच गणरायाच्या चरणी पाटील यांनी प्रार्थना केली.