महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने घेतलेल्या विविध उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य मिळेल, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) च्या ऑफिस मध्ये भेट दिली. यावेळी त्यांच्यासमोर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) तर्फे गेल्या २५ वर्षातील कार्याचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रासह अन्य राज्ये आणि देशांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन एमकेसीएलने विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमांची पाटील यांनी प्रशंसा केली.
एमकेसीएलने घेतलेल्या विविध उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य मिळेल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आले.
या कार्यक्रमात एमकेसीएलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत आणि व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे तसेच डॉ. सतीश देशपांडे उपस्थित होते.