उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक संपन्न… हिवाळी अधिवेशन 2025 च्या पार्श्वभूमीवर विभागाचा घेतला आढावा

मुंबई : मंत्रालय येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची बैठक पार पडली. आगामी हिवाळी अधिवेशन 2025 च्या पार्श्वभूमीवर विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरवणी मागणी संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आगामी कामकाजाचे नियोजन करण्यात आले.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.