ठाणे (पश्चिम) येथे रिव्हीएरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
ठाणे : ठाणे (पश्चिम) येथे रिव्हीएरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. यावेळी पाटील यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या नव्या रुग्णालयाच्या माध्यमातून ठाणे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपचारपद्धती आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. या रुग्णालयात सांध्यांच्या दुखण्यावर अद्ययावत उपचार घेता येणे शक्य होणार आहे.
या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका सौ.परीषा सरनाईक, निवृत्त न्यायमूर्ती मारूतीराव गायकवाड आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.