डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस पुणे विद्यापीठा’चा दुसरा वर्धापन दिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस पुणे विद्यापीठा’च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जर्मनी आणि जपान या देशांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारशी करार केला आहे. खासगी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन, रोजगाराभिमुख पिढी निर्माण करण्याची जबाबदारी उचलावी, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. तसेच डीईएस पुणे विद्यापीठाला नवीन इमारत, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र आचार्य, डीईएसचे उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, डीईएस संस्थेचे कार्यवाह प्रा. डॉ. आनंद काटीकर आणि डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेश इंगळे यावेळी उपस्थित होते.