पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान लवकरच सुरु होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : आपला परिसर तारांगणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य दिवाळी महोत्सवास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान लवकरच सुरु होणार आहे, अशी आनंददायी माहिती यावेळी पाटील यांनी उपस्थिताना दिली. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पणही यावेळी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आयोजक उज्ज्वल केसकर, पुनीत जोशी, दीपक पोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.