पिंपरी चिंचवडमध्ये मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाच्या धर्तीवर अद्यावत व सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारावे, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

80

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील सर्वांत वेगवान विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून, शहराची लोकसंख्या तब्बल ३० लाख आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि सध्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक महत्वपूर्ण अशी मागणी केली आहे. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाच्या धर्तीवर अद्यावत व सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारावे अशी मागणी तुषार हिंगे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

तुषार हिंगे यांनी आपल्या या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीच्या सुधारित मंजूर विकास योजनेतील मौजे पिपरी वाघेरे येथील “बेघरांसाठी परे” हे आरक्षण अद्यापपर्यंत जागेवर विकसित झाले नसल्यामुळे या आरक्षणाचे प्रयोजनात बदल करुन जे.जे. रुग्णालय मुंबईच्या धर्तीवर अद्यावत व सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उभारावे. त्या ठिकाणी J.J. Super Speciality हॉस्पिटलच्या धर्तीवर अद्यावत व सुसज्ज उपकरणे, अति विशेष विभागासाठी Neurosurgery, Urosurgery, Cardiology, Cardiac Surgery इत्यादी महत्वाचे विभाग सुरु करता येतील.

वाय .सी. एम. हॉस्पिटल हे पिपरी चिंचवड महानगरपालिकेचे मालकीचे हॉस्पिटल आहे. N.M.C. सर्टिफिकेशनच्या मानांकनानुसार वैद्यकीय महाविद्यालयाबा भूखंड हा १० एकर असावा लागतो. सध्या वाय. सी. एम. हॉस्पिटलचा भूखंड हा ८.५ एकरचा आहे. तथापि त्यांच्या शेजारील १.५ एकर मनपाची जागा आहे. ती जागा आरक्षण बदलण्यासाठी (झोन चेंज) नगर विकास विभागाला पाठविले आहे. सदर प्रकल्पासाठी लवकर बैठक लावावी व हा प्रकल्प आपल्या मार्फत राबविला जावा अशी विनंती तुषार हिंगे यांनी आपल्या या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

तुषार हिंगे यांनी केलेल्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकरात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.