पिंपरी-चिंचवड इक्वेस्ट्रीअन असोसिएशन तर्फे हॉर्स शो जम्पिंग स्पर्धा स्थळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट
पिंपरी-चिंचवड : आमदार उमाताई खापरे यांच्या संकल्पनेतून आमदार चषकांतर्गत पिंपरी-चिंचवड इक्वेस्ट्रीअन असोसिएशन तर्फे हॉर्स शो जम्पिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा स्थळी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांशी मी जोडला गेलो आहे. हॉर्स शो जम्पिंग हा क्रीडा प्रकार देखील आता आपल्या देशात लोकप्रिय होत असून, आगामी काळात राज्यभर अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आ. शंकरभाऊ जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, केशव घोळवे, डॉ. संजीवनी पांडे, जयदीप खापरे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, धर्म वाघमारे, वैशाली खाडे, गणेश लंगोटे, सुनील कदम, हेमंत हरहरे, संतोष जाधव, सतीश नागरगोजे, कुणाल लांडगे, तुषार हिंगे, महेंद्र बाविसकर, मंगेश घाडगे, सुनिल पालंडे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.