पिंपरी-चिंचवड येथे भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस सतीश नागरगोजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथे भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस सतीश नागरगोजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सतीश नागरगोजे यांचे अभिनंदन करताना हे कार्यालय जनसेवा आणि कार्यकर्त्यांशी संवादाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास आ. शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, केशव घोळवे, डॉ. संजीवनी पांडे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, धर्म वाघमारे, वैशाली खाडे, गणेश लंगोटे, सुनील कदम यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.