शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी सतत प्रयत्न करावेत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : पुणे येथे बन्सीलाल रामनाथ आग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले व उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत संस्थेचा नावलौकिक वृद्धिंगत करणाऱ्या विद्यार्थी, विविध विभागांचे प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना यावेळी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारी आहे. या प्रक्रियेत प्राध्यापकांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असून VIT ने आपल्या उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवली आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी सतत प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत अग्रवाल, संचालक प्रा. डॉ. राजेश जालनेकर, उपाध्यक्ष बी. बी. लोहिया यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.