मंत्री चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर… आष्टा शहराच्या सर्वांगीण विकासासाठीचे धोरण जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याचे केले मार्गदर्शन
सांगली : सांगली येथे आज आष्ट्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. बापूसाहेब शिंदे यांचे नातू संग्रामसिंह शिंदे यांच्या आष्ट्यातील निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यासोबतच नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण उर्फ सतीष माने तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांशी स्नेहपूर्ण संवाद साधला.

या वेळी मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करून, आष्टा शहराच्या सर्वांगीण विकासासाठीचे धोरण जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याचे मार्गदर्शन चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान शिंदे कुटुंबीयांसोबत विविध विषयांवर अनौपचारिक संवाद साधत त्यांचे सहकार्य, आदरातिथ्याबद्दल पाटील यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली महापालिका प्रभारी शेखर इनामदार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, तसेच भाजपा आष्टा नगर परिषद निवडणूक प्रभारी स्वरूपराव पाटील, प्रसाद पाटील, अमोल पडळकर, रॉबिन पोरवाल आणि भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.