आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा पिंपरी-चिंचवड शहराची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक संपन्न
पिंपरी – चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा पिंपरी-चिंचवड शहराची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमाताई खापरे, महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शहर संघटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आगामी मनपा निवडणुकीसाठी आवश्यक धोरणे, तयारी, समन्वय आणि संघटन बळकटीकरणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘‘विकसित महाराष्ट्र’’ घडवण्यासाठी भाजपाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवणे आणि ‘‘शत प्रतिशत भाजपा’’ निर्धार यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.