विकासकामांना अनुसरुन हा विकास असाच शाश्वत राहण्यासाठी लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा – मंत्री चंद्रकांत पाटील

109
अकोला : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपकडून आता जोरदार प्रचाराला सुरवात झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कालपासून भाजपाच्या प्रचार आणि  प्रसारासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान  भाजपा वैद्यकीय आघाडीची बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, अकोला जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजपा वैद्यकीय आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहिलो. दरम्यान, देशात सुरु असलेल्या विकासकामांना अनुसरुन हा विकास असाच शाश्वत राहण्यासाठी लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी आघाडीचे अध्यक्ष डॉ. राजू देशपांडे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.