म्हाळुंगे गावात भाजपचा झंझावात! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भव्य रोडशोला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
पुणे : पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ म्हाळुंगे गावात भव्य रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रोडशोला म्हाळुंगेवासियांनी उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वत्र सकारात्मक व मोठे समर्थन मिळत असल्याचे पाटील म्हणाले.

यावेळी माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत आग्रही असून हा आराखडा सर्वानुमते मंजूर केला जाईल. म्हाळुंगेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रशासनाशी संवाद साधला जात असून, नागरिकांच्या सूचनांचा आणि मतांचा विकास आराखड्यात समावेश करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात विकास आराखड्याला मंजुरी मिळून गावाचा सर्वसमावेशक विकास निश्चित होईल, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या रोडशोला भाजपा प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे, तसेच भाजपाचे निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.