कोथरूडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकांचा गौरव; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
पुणे : कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ येथील भाजपा कार्यकर्ते राहुल कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा तसेच नवनिर्वाचित नगरसेविका मयुरी कोकाटे आणि रोहिणी चिमटे यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राहुल कोकाटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच दोन्ही नवनिर्वाचित नगरसेविकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर तसेच पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक रवी लांडगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.