भाजपा पुणे शहरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

7

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाली. महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करताना पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करावा तसेच विकसित पुणे घडवण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

पुणेकरांनी नुकतेच निवडून दिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांशी संवाद साधत आगामी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक बहुमत दिलं असून या बहुमताचा मान प्रत्येक नगरसेवकाने आपल्या कार्यातून राखावा असे आवाहन यावेळी सर्वांना करण्यात आले. हे बहुमत केवळ विजय नसून जनतेची मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव करून देत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या कार्यातून पारदर्शक, विकासाभिमुख आणि लोककेंद्रित कारभाराचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले. पुणेकरांच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर यांच्यासह भाजपाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.