औरवाडमध्ये भाजप महायुतीचा जयघोष; शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी सरकार कटिबद्ध – मंत्री चंद्रकांत पाटील

9

कोल्हापूर : जिल्हा परिषद व शिरोळ पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरवाड येथे चौक सभेच्या माध्यमातून मतदार बांधवांशी संवाद साधला. या वेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पाटील यांनी त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एफआरपी कायदा लागू करून झोनबंदी उठवली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचा योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही श्री दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून दर बारा वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या कन्यागत महापर्वासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी १२१ कोटींचा निधी दिल्याने हा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. याशिवाय अलास, गणेशवाडी, कवठेमाळ, अब्दुललाट, आकीवाट आदी गावांतील विकासकामांसाठी २९.१९ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी माननीय मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

या प्रसंगी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रजनीताई मगदूम, राजू रावण, मल्लाप्पा चौगुले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल मादनाईक, विजय भोजे, महेश देवताळे, राहुल घाटगे, शिवाजी खोद्रे, अनवर जमादार यांच्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.