केंद्रीय अर्थसंकल्प हा विकासाचा रोडमॅप; शिरढोणच्या सभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला प्रगतीचा आराखडा

103

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ शिरढोण येथे भव्य जाहीर सभा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जनतेचा विकासाभिमुख नेतृत्वावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे जाणवले. यड्राव आणि शिरढोणच्या जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपा महायुतीचाच झेंडा फडकवण्याचा निर्धार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

पाटील म्हणाले, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी सातत्याने कठोर परिश्रम घेत आहेत. देशातील प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण जी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग आणि उद्योजकांच्या सर्वांगीण प्रगतीचा रोडमॅप आहे. शेतकरी सन्मान योजना, लखपती दीदी यांसारख्या योजनांसह ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या SHE-Mart सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.

“सबका साथ, सबका विकास” या ध्येयाने काम करणारे मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

या प्रसंगी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रजनीताई मगदूम, यड्राव जिल्हा परिषद उमेदवार संजना पुजारी, शिरढोण पंचायत समिती उमेदवार तेजस्विनी यादव, विजय पाटील तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल मादनाईक, विजय भोजे, महेश देवताळे, राहुल घाटगे, शिवाजी खोद्रे आणि भाजपा महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.