दतवाड-घोसरवाडमध्ये भाजपची ‘मोर्चेबांधणी’; अनेक कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश
कोल्हापूर : दतवाड आणि घोसरवाड येथे रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारार्थ चौक सभांमधून मतदार बांधवांशी थेट संवाद साधला. विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन पंचक्रोशीतील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या सर्वांचे पाटील यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोककल्याणासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाला बळ देत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपा महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रजनीताई मगदूम, संजय पाटील, दत्तवाड जिल्हा परिषद उमेदवार मृणालिनी जाधव-पाटील, पंचायत समिती उमेदवार बाबुराव पोवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल मादनाईक, विजय भोजे, महेश देवताळे, राहुल घाटगे, शिवाजी खोद्रे यांच्यासह भाजपा महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.