कोथरूडमध्ये ‘मानसी’चा जागर; जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सुप्त गुणांना मिळालं हक्काचं व्यासपीठ

8

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोथरूडमध्ये ‘मानसी’ उपक्रमांतर्गत महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि स्वतःचे विचार मुक्तपणे मांडावेत, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

महिलांना केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. कार्यक्रमात आयोजित विविध खेळ, गप्पा आणि संवादात्मक सत्रांमुळे उपस्थित महिलांचा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळाला.

उद्याच्या समर्थ भारताच्या आधारस्तंभ असलेल्या आपल्या माय-लेकींच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खरोखर समाधान वाटले. आमच्या भगिनींनी अशाच जिद्दीने यशाची शिखरे सर करावीत, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.