सांगलीमध्ये ‘शपथ विधी, विथ चहा’, मिळणार मोफत चहा

162

सांगलीच्या ‘सलगरे अमृततुल्य’ कडून शपथविधी सोहळा प्रसंगी मोफत चहा देण्यात येणार आहे. सलगरे चहाचे विक्रेते विजय पाटील यांनी या अभिनव माँचे उपक्रमाचे आयोजन केले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपने एक हाती सत्ता मिळवली.आज दिनांक 30 मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहेत. त्यानिमित्ताने सांगलीमध्ये सलगरे अमृततुल्य चहा यांच्यातर्फे ‘शपथ विधी, विथ चहा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 ते रात्री आठ पर्यंत शपथविधी सोहळा हा मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे तसेच यावेळी उपस्थितांना मोफत चहा देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन विजय पाटील आणि अंकुश पाटील यांनी केले आहे.! कार्यक्रमाचे ठिकाण- उत्तर शिवाजी नगर कॉलेज कॉर्नर रोड आर्या पान शॉप समोर सांगली हे असून वेळ-5वाजता सायंकाळी या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.